Skip to content

(Marathi) Youth for the Coast – Cohort V | Maharashtra | 28th October to 01st November 2022 | Applications Closed

मासेमारी ही आहाराचा स्रोत,पोषण, रोजगार आणि मिळकत ह्या सर्वांच्या द्रुष्टीने एक महत्तवाची उपजिवीका आहे. ह्या क्षेत्रातून १६ दशलक्षाहून अधिक मासेर आणि मत्स्यशेती करणार्यांना रोजगार उपलब्ध होतो तसेच ह्याच्या दुपटीहून अधिक लोकांना उत्पादन साखळीतून रोजगार मिळतो. ह्या क्षेत्राचे महत्त्व, संभाव्य वाढीची शक्यता आणि शाश्वत विकास ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी २०१९ मध्ये मत्स्यव्यवसाय विभागाची निर्मिती करण्यात आली. भारतात मत्स्य उत्पादनात गेले काही वर्षे सातत्याने वाढ होते आहे जी ७% वार्षिक वाढीपर्यंत नोंदवली गेली आहे. ह्या क्षेत्रातून विदेशी चलनाच्या मिळकतीची सुद्धा वाढ झाली आहे तसेच भारत हा जगातील मत्स्य निर्यातदार देशांपैकी एक आघाडीचा देश म्हणून उदयास आला आहे.

भारतात गेल्या काही वर्षांत पर्यावरणीय धोरणात कमलीचा बदल आला आहे. ह्याचे प्रतिबिंब महासागर तसेच सागरी किनार्यासंदर्भातील नजीकच्या वर्षांत आलेल्या धोरणात किंवा प्रस्तावित असलेल्या धोरण बदलात तसेच सरकारी कार्यक्रमांतही आढळते. म्हणून मच्छीमार तसेच मच्छीमारी संदर्भात काम करणाऱ्या समुदायांना या धोरणांची माहिती देणे तसेच त्यातून येऊ घातलेले बदल त्याचे विविध पातळीवर तसेच निसर्गावर होणारे परिणाम यासंदर्भात जागरूकता निर्माण करणे गरजेचे झाले आहे. तसेच याविषयावर काम करण्यासाठी सामूहिक बांधणी करणे गरजेचे आहे, जे समूह मच्छीमार समुदायाला सर्व स्तरावर माहिती पुरवणे आणि समर्थनाचे काम करतील ज्यामुळे हे समुदाय निसर्ग, किनारे, उपजिविका यावर होणाऱ्या परिणामांच्या आअलनातून निर्णय घेण्यास सक्षम बनतील.

युथ फॉर कोस्ट म्हणजे काय आहे?

युथ फॉर कोस्ट ची पहिली राष्ट्रीय कार्यशाळा ६ दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या स्वरुपात गोवा येथे झाली. याकरिता सागर आणि सागरी किनार्याच्या विविध पैलूंवर काम करण्यास उत्सुक असणाऱ्या किंवा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या २२ तरुण सहभागी झाले. दुसरी कार्यशाळा तामिळनाडू, पॉंडिचेरी ला पार पडली. यात कार्यकर्ते, करिअच्या मध्यावर असणारे व्यावसायिक ज्यांना या संदर्भातील आपली समज व ज्ञान वाढवून या संदर्भातील चळवळी व संस्थांना मदत व एकता प्रस्थापित करण्याच्या दिशेने काम करायचे आहे त्यांनी सहभाग घेतला. ही तामिळनाडूमध्ये काम करण्यास इच्छुक असणार्यांसाठी प्रादेशिक कार्यशाळा होती. आमची तिसरी कार्यशाळा पश्चिम बंगाल येथे झाली, ज्यात १९ तरुणांनी सहभागी झाले. त्यानंतर चौथी कार्यशाळा तिरुअनंतपुरम, केरळा येथे झाली ज्यात देशाच्या विविध भागातून, वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी असलेले १८ तरुण सहभागी झाले.

उद्दिष्टे:

1. लहान-मोठ्या मासेमारी क्षेत्रात गुंतलेल्या लोकांच्या उपजीविकेला आधार देणारी पर्यावरणीय प्रणाली म्हणून महासागर आणि किनारपट्टीची मूलभूत समज निर्माण करणे.

2. महासागर आणि किनार्‍याच्या पर्यावरणीय, सामाजिक-आर्थिक आणि सामाजिक-राजकीय पैलूंमधील गतिशीलता कशी जोडलेली आहे हे समजून घेणे.

3. भारतातील मत्स्यव्यवसाय विकासाचा मूलभूत इतिहास आणि सध्याच्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी लोक चळवळीतील संघर्षाची कथा सादर करणे.

4. ब्लू इकॉनॉमी अंतर्गत कायदा, धोरण आणि महासागर आणि किनारपट्टीचे शासन कसे संरचित आणि बदलत आहेत याचे विहंगावलोकन देण्यासाठी

कार्यक्रम:

ह्या कार्यक्रमातून सहभागी व्यक्तींना जटिल सामाजिक-परिस्थितीकीय पाणी आणि जमीन माहिती आणि संसाधने याने सुसज्ज केले जाते. ही सत्रे अशा प्रकारे आखली जातात की त्यातून सहअध्ययन, फिल्ड भेटीतील सहभाग, स्थानिक समुदायाच्या नेत्यांशी संवाद, समुद्र किनार्याच्या मुद्द्यांवर काम करणाऱ्या अभ्यासक आणि कार्यकर्त्यांशी चर्चा याचा यात समावेश होतो. सहभागी व्यक्तींना राष्ट्रीय तसेच महाराष्ट्र राज्य पातळीवर समुद्र किनार्याशी संलग्न विषयावर काम करणाऱ्या चळवळी/संस्था, द्रुष्टीकोन आणि धोरणे यांची ओळख करून दिली जाते, ज्यामुळे धोरणात्मक बदलांचा त्यांच्या स्थानिक मच्छीमार समुदायावर होणारा परिणाम समजण्यास शक्य होऊन ते स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर योग्य त्या प्रतिक्रिया नोंदवू शकतात.


याकरिता कोण अर्ज करु शकतात:

मच्छीमार, मच्छीमार समुदायातील युवक/युवती, अभ्यास, मिडीया व्यावसायिक, ज्यांना समुद्रकिनार्यांवरील मुद्यांवर काम करण्यात रस आहे, प्रामुख्याने ९ सागरी किनार्यावरील राज्यातील रहिवासी, महाराष्ट्र राज्यातील किंवा ज्यांना महाराष्ट्राशी संलग्न विषयावर काम करायचे आहे.

वयोमर्यादा: २२-३५ वर्षे

भाषा: मुख्यत्वे मराठी आणि इंग्रजी

तारीख:

आगमनाची तारीख : २७ ऑक्टोबर २०२२ (संध्याकाळी ६ वाजेपर्यंत)

कार्यक्रमाच्या तारखा : २८ ऑक्टोबर – १ नोव्हेंबर २०२२

निघण्याची तारीख: १ नोव्हेंबर २०२२ (संध्याकाळी ६ वाजेच्या आधी)

प्रवास: आमची सहभागी व्यक्तींना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या प्रवासाची व्यवस्था ट्रेन (स्लीपर/3rd AC)/बसने करावी. प्रवासाच्या तिकीटाची मूळ प्रत जमा केल्यास आम्ही ₹३००० पर्यंत तिकीटभाड्याची परतफेड करु.

ठिकाण: महाराष्ट्र

अर्ज कसा करावा?

युथ फॉर कोस्टच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी, पुढील लिंक वर जाऊन अर्ज भरावा: https://tinyurl.com/Y4CoastRegional

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: १४ ऑक्टोबर २०२२

संपर्क: कार्यक्रमासंदर्भात कोणत्याही प्रकारची शंका असल्यास किंवा अधिक माहितीसाठी [email protected]/ [email protected] या ईमेलवर संपर्क करा.